परांडा तालुका डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्ष पदी नूरजहाँ शेख
परांड्यात डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड
परांडा | प्रतिनिधी
परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटनेच्या कार्याचा विस्तार आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरासाठी या बैठकीत सोशल मीडिया विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
बैठकीत सर्वानुमते नूरजहाँ शेख यांची सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदी, संतोष शिंदे यांची उपाध्यक्षपदी तर धनंजय गोफणे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. डिजिटल पत्रकारिता आणि सोशल मीडिया क्षेत्रातील संघटनेच्या उपक्रमांना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे प्रामाणिकपणे पालन करत जनतेच्या समस्या, सामाजिक प्रश्न तसेच विकासकामांशी संबंधित माहिती अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून पत्रकारितेची विश्वासार्हता आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य फारुख शेख, तानाजी घोडके, रणजीतकुमार शिंदे, रावसाहेब गायकवाड, अमोल निकाळजे, विजय मेहर आणि अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत संघटनेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
परांडा शहर आणि तालुक्यातील पत्रकारिता, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, या नव्या नेतृत्वामुळे डिजिटल मीडिया संघटनेच्या कार्याला अधिक गती आणि नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परांडा येथील डिजिटल मीडिया संघटनेच्या बैठकीत नूरजहाँ शेख अध्यक्ष, संतोष शिंदे उपाध्यक्ष आणि धनंजय गोफणे सचिव म्हणून निवड. संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत
Comments
Post a Comment